HW News Marathi
महाराष्ट्र

‘नितेश राणे हरवलेत, शोधून देणाऱ्याला मिळेल कोंबडी’; मुंबईत बॅनरबाजी

मुंबई | शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काल (३० डिसेंबर) न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. एकीकडे त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तर दुसरीकडे भाजप कार्यालया शेजारीच नितेश राणे हरवले असल्याचे बॅनर लावण्यात आले. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल, असंही बॅनरवर लिहण्यात आलं आहे.

नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाल्यापासून ते अज्ञातस्थळी आहेत. पोलीसही त्यांचा शोध घेत असून यावरुनच मुंबईतील गिरगाव येथील भाजप कार्यालयाशेजारी तसेच चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परीसरातही नितेश राणेंच्या फोटोसह बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरद्वारे राणे कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. या बॅनरवर नितेश राणे हरवले असल्याचा दावा करण्यात आला असून त्यांची माहिती देणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस दिली जाईल, असे देखील बॅनरमध्ये लिहण्यात आलंय.

नितेश राणे पोलिसांसमोर येत नसल्याने मुंबईत ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. राणे कुटुंबीयांना डिवचण्यासाठी लावण्यात आलेले हे बॅनर नक्की कोणी लावले याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र, सध्या या बॅनरवरून जोरदार चर्चा सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. तसेच या प्रकरणातील एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान नितेश राणेंचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, काल (३० डिसेंबर) न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जल आक्रोश नव्हे हा तर भाजप नेत्यांच्या आतला आक्रोश; धनंजय मुंडेंचा खोचक टोला

News Desk

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्ध काँग्रेस छेडणार आंदोलन

News Desk

“तुम्हाला अडचण असेल तर….”, मुख्यमंत्र्यांवरच्या गंभीर आरोपावरुन शिवसेनेचा कॉंग्रेसला पलटवार

News Desk