HW News Marathi
क्राइम

“आताच्या पक्षप्रमुखांची शप्पथ घेतली असती, तर परबांवर अजुन विश्वास बसला असता”- नितेश राणे

मुंबई | अनिल परब यांच्या या विधानावर कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी त्यांना टोला लगावला आहे. नितेश राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र आहेत. “स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांपेक्षा, आताच्या पक्षप्रमुखांची शप्पथ घेतली असती, तर परबांवर अजुन विश्वास बसला असता” असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.मध्यंतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमध्ये अनिल परब महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे एका व्हिडीओमधून दिसले होते. तेव्हापासूनच, अनिल परब यांना टार्गेट करण्यात येईल, अशी चर्चा होती.

मी शिवसेनाप्रमुखांची, माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगेन की,

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. ईडीने त्यांना दुसरं समन्स बजावल्यानंतर अनिल परब हजर राहिले. चौकशीला निघत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मला ईडीचं दुसर समन्स मिळालं आहे. मी आता चौकशीला जात आहे. मी शिवसेनाप्रमुखांची, माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगेन की, मी काहीही चुकीचं काम केलेलं नाही” असं अनिल परब म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बसवर फेकला पेटता गोळा

News Desk

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने आदिवासी नेत्यावर प्राणघातक हल्ला करून धिंड काढली

News Desk

Pune Wall Collapse : १४ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

News Desk