HW News Marathi
महाराष्ट्र

 ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’, नितेश राणेंचे सूचक वक्तव्य

सिंधुदुर्ग | कृषी विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध नाहीच, असा दावा करत ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’, असं सूचक वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. सिंधुदुर्गात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी भाष्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल सभागृहात कृषी विधेयकावर बोलले पण त्यांनी या विधेयकाला कुठेही विरोध केला नाही, फक्त त्यांनी सभात्याग केला. मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की एक घोषणा आहे ना… ‘ये अंदर की बात है’, त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं, असे नितेश म्हणाले आहेत.

कृषी विधेयकावरून सध्या आघाडी सरकार विरुद्ध मोदी सरकार असे युद्ध सुरू आहेच. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात हे विधेयक लागू होणार नसल्याची घोषणा केली आहे. अशात भाजप नेते नितेश राणे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. शेती आणि शिवसेनेचा कसलाही संबंध नाही. कृषी विधेयकावर संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केले. त्यांच्या पक्षाला नेमकं कुठं जायचंय, त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे त्यांना हेच माहिती नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे म्हणाले, जेव्हा हे विधेयक सभागृहात मांडण्यात आलं तेव्हा महाविकास आघाडीतील दुसरे पक्ष मग राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, आपण जर त्यांच्या नेत्यांची भाषणं व्यवस्थित ऐकली तर असं लक्षात येईल की संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं. त्यांना माहितीच नाही की त्यांच्या पक्षाला नेमकं जायचंय कुठं, किंबहुना शेती कुठे करतात आणि कशी करतात हे त्यांच्या नेतृत्वाला माहिती नाही. शेतीवर ते कधीही भूमिका घेत नाहीत.

काँग्रेस कृषी विधेयकाला करत असलेल्या विरोधावर बोलताना नितेश म्हणाले, “काँग्रेस पक्ष आज पुढे येऊन आंदोलन करतोय पण स्वत: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे २०१३ ला विधान आहे की आम्ही जर सत्तेत आलो की बाजार समित्या रद्द करू. तसेच, २०१९ च्या जाहीरनाम्यात देखील त्यांनी तेच आश्वासन दिलं होतं. ते जे करणार होते तेच आताच्या सरकारने पाऊल उचललं आहे मग त्यांचा आता विरोध कशासाठी? की फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून ते विरोध करतायत?, असा सवाल देखील त्यांनी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही’, संजय राऊतांची संतप्त टीका

News Desk

मुदखेड – शिवनगाव दरम्यान तिरुपती एक्सप्रेस रेल्वे रुळावरुन घसरली

News Desk

विधान परिषदेच्या ‘या’ दहा सदस्यांना निरोप

Aprna