HW News Marathi
महाराष्ट्र

“कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…”अमृता फडणवीसांचे नवे गाणे येणार भेटीला

मुंबई | विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. येत्या महिला दिनी त्यांचे नवे गाणे प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. त्यामुळे अमृता फडणवीसांच्या चाहत्यांची उत्कंठा आणखी ताणली गेली आहे. तसेच, अमृता फडणवीस अनेक मुद्द्यामूळे कायमच सोशल मिडियावर ट्रोल होत असतात.

“जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी….. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही !’स्त्री शक्ती’ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी !” अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली आहे. ८ मार्चला महिला दिनाच्या दिवशी आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या.

अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मूळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

अमृता फडणवीसांच्या गळ्यात ‘जॅझ’ सुरावट

अंधार’ या आगामी चित्रपटासाठी अमृता फडणवीसांनी याआधी एक गाणं गायलं होतं. जीत गांगुली यांनी अंधार चित्रपटातील हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. जॅझ संगीत पद्धतीचं हे गाणं आहे. ‘रोज रोज पाठीमागे सावली असेल ही अनोळखी, दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ही कोणाची’ असे या गाण्याचे शब्द आहेत. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.

अमृता फडणवीस यांची यापूर्वीही अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर, राणेंचा गंभीर आरोप

News Desk

‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’ ED कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

News Desk

राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांच्या पॅनेलने कुटासा गावात १० जागा राखल्या

News Desk