HW News Marathi
महाराष्ट्र

“मोठ्या कडून नाही पण धाकट्या कडून अपेक्षा आहेत..” , तेजस ठाकरेंच्या प्रवेशावर नितेश राणेंची प्रतिक्रिया

मुंबई। शिवसेनेत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे राजकारणात येण्याची चर्चा आहे. लवकरच तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार अशी चर्चा सुरु आहे. यामागील कारण म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना वृत्तपत्रात तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छापून आलेली जाहिरात आहे. या जाहिरातीमुळे तेजस ठाकरेदेखील महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशावरुन भाजपा आमदार नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

नितेश राणेंची राज्यपालांना भेट

नितेश राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गणेश मंडळांना राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे, याबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशांसंबंधी विचारण्यात आलं आहे.

अगोदर थोडा अपेक्षाभंग झाला होता, पण लहान भाऊ तरी पूर्ण करेल

तेजस ठाकरेच्या पक्ष प्रवेशाबद्दल नितेश राणे म्हणाले, “ठाकरे कुटुंबातून कोणी राजकारणात येत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत. बाळासाहेबांचा आवाज आणि करारीपणा यांनी तरी घ्यावा अशी अपेक्षा आहे. अगोदर थोडा अपेक्षाभंग झाला होता, पण लहान भाऊ तरी पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे,” असा टोला नितेश राणे यांनी लगावला. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरेंची तुलना व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी केली आहे. यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “तुलना का केली हे त्यांनाच विचारा. भावाला शुभेच्छा दिल्यात की भावांमध्ये वाद निर्माण केला हेच कळत नाही”.

तेजस ठाकरेंचा पक्ष प्रवेश?

उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा शनिवारी वाढदिवस होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये एक जाहिरात छापली होती. याच जाहिरातीवरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाली. या जाहिरातीमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, त्यासोबतच त्यांनी तेजस ठाकरे यांना “ठाकरे कुटुंबाचा व्हिव्हियन रिचर्ड्स” म्हटल्यामुळे खरी राजकीय चर्चा सुरू झाली होती. खुद्द मिलिंद नार्वेकर यांनी जरी या जाहिरातीमागे राजकीय हेतू नसल्याचं सांगत चर्चा फेटाळून लावली असली, तरी तेजस ठाकरेंना व्हिव्हियन रिचर्ड्स यांची उपमा दिल्यामुळे त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र नक्की दिला असेल, राऊतांची फडणवीस-पवार भेटीवर प्रतिक्रिया

News Desk

सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेशासाठी लसीकरण बंधनकारक! – पालकमंत्री छगन भुजबळ

News Desk

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली!

News Desk