मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा दर वर्षी सिवसैनिकांसाठी पर्वणीच असतो.यांदा हा दसरा मेळावा शन्मुखामंद सभागृहात होता. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर आपली तोफ डागली होती. त्यावर भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडत नव्हते. मात्र, कालच्या भाषणात प्रत्येक वाक्यात खोटारडेपणा होता. बाळासाहेब असते तर सगळ्यात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केलीय.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याशिवाय कुणीही कधी मुख्यमंत्री होणार नाही, असा दावाही नितेश राणेंनी केला
राजसाहेब, राणेसाहेबांना षडयंत्र करुन बाहेर केलं. रावते, शिंदेंसारख्या कडवट शिवसैनिकांना माझं आवाहन आहे. मी लहान आहे. पण तुम्हाला कधीच संधी मिळणार नाही. ठाकरे परिवार सोडून एकजणही मुख्यमंत्री होणार नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याशिवाय कुणीही कधी मुख्यमंत्री होणार नाही, असा दावाही नितेश राणेंनी केलाय.नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना तुम्हाला पहिल्यापासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणूनच तुम्ही पूजापाठ केले. असं देखील ते म्हणाले. एकनाथ शिंदेंनी विचार करावा. उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी धोका आहे. बंगाल पॅटर्नमध्ये 40 हजार हिंदू मारले गेले, तिथे हिंदुत्वाची व्याख्या सांगणार का? असा सवाल नितेश राणे यांनी केलाय. कालच्या भाषणानंतर हिंदू खतरे मे है. त्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार असतील, असंही नितेश राणे म्हणाले.
भाजपला जनतेने नाकारलं नाही. आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी 70 टक्के जागा जिंकलो. आम्हाला जनतेने नाकारलं नाही. तुम्ही बेईमानीने सरकार बनवलं. आताचं तयार झालेलं सरकार हे बेईमानीने बनलेलं आहे, असा घणाघाती हल्ला फडणवीसांनी केला.एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं लुटले जायचं, पण काल मुख्यमंत्र्यांना गरळ ओकताना बघितलं, अशी घणाघाती टीकेने फडणवीसांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली. भाजपला जनतेने नाकारलं नाही. उद्धव ठाकरे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. पण त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे. अनेकदा शिवसेनेकडे उमेदवार नव्हता तेव्हा भाजपने त्यांना उमेदवार दिल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.