मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर युवासेनेने मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द काढल्याने गुन्हा दाखल केला आहे. यावरून राजकारण आता चांगलंच पेटलं आहे. त्यामुळे मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी तसे ट्विट केले आहे.
नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्याविरोधात महाड आणि नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस याप्रकरणाचा पुढील तपास करतील. तर नाशिकमध्ये पोलिसांच्या सायबर सेलकडून राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे ट्विट?
भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत शिसैनिकांना आव्हान दिल आहे. ते म्हणाले, “माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
Hearing the news of Yuva Sena members been told to gather outside our Juhu house..
either Mumbai police stops them from coming there or whatever happens there will be not our responsibility!!
Don’t dare to walk into the lions den !
We shall be waiting!— nitesh rane (@NiteshNRane) August 23, 2021
नारायण राणे काय म्हणाले?
पिंजऱ्यात राहतो… हा कसला मुख्यमंत्री
आताचे राज्य, या राज्याला मुख्यमंत्री आहे, मला वाटत नाही. मुख्यमंत्री कोण आहे? काही दम नाही ओ, पिंजऱ्यात राहतो…हा कसला मुख्यमंत्री? मातोश्रीच्या बाहेर पडत नाही,” अशी टीका राणे यांनी केली. “जनतेत जायला पाहिजे, प्रश्न काय, अडचणी काय, काय केल्याने बेकारी जाईल यावर विचार केला पाहिजे,” असं नारायण राणे म्हणाले आहेत.
मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती
राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.
मातोश्रीचं परिवर्तन झालं एकाचे दोन बंगले झाले
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. मग मराठी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन का होऊ शकलं नाही? मोतश्रीचं परिवर्तन झालं. एकाचे दोन बंगले झाले. मराठी माणसाच्या जीवनामध्ये काहीही फरक नाही. आजही मराठी तरुणांमध्ये बेकारी आहे. आजही शिवसैनिकांमध्ये बेकारी आहे. आजही शिवसैनिक घरी जातो तेव्हा चुल पेटली की नाही, आईने काही शिजवलं असेल की नाही, ही चिंता असते. त्यालाही वेळ का आली?” असा सवाल नारायण राणे यांनी केला.३२ वर्षांत मुंबई बकाल करून टाकली. किती माणसं मुंबईत कोरोनामुळे गेले, कुणामुळे? औषधामध्ये देखील यांनी पैसे खाल्ले आहेत. शिवसेनेने अशी वेळ आणू नये की कसे पैसे खाल्ले हे मी लोकांसमोर उघड करीन. जनतेचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवा आणि मग काय करायचं ते करा,” असं राणेंनी म्हटलं होतं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.