HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘पार्थ लंबी रेस का घोडा,मित्रा थांबू नकोस’ नितेश राणे धावले पार्थ पवारांच्या मदतीला…

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि शरद पवार यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेताना दिसून आले. आज शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी मात्र त्यांना ‘लंबी रेस का घोडा’ म्हणतं त्यांच कौतुक केलं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी “पार्थ पवार अपरिपक्व. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही”, असे म्हणत शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांची नाराजी अगदी उघडपणे दिसून येत आहे.

त्यानतंर लगेचं आमदार नितेश राणेंनी ट्विट करत ‘परत सांगतो, पार्थ लांबी रेस का घोडा है !, थांबू नकोस मित्रा”, पार्थ पवारांना पाठिंबा दिला आहे.दुसरीकडे पार्थ पवारांच्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याबाबतच्या भूमिकेवरही भाजपने समर्थन दिलं होतं.

Related posts

शौचालयाची टाकी कोसळून तीन जणाचा मृत्यू

News Desk

मुख्यमंत्र्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा | सुप्रिया सुळे

News Desk

नालायकांसाठी आपल्या जीवाची बाजी लावू नका !

News Desk