HW News Marathi
महाराष्ट्र

“…मग भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाहीत का?”, नितेश राणे संतप्त

मुंबई। राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड वर्ष होऊन गेली तरी अद्यापही मंदिरं बंदच आहेत. सरकारने मंदिरं लवकरात लवकर सुरु करावी म्हणून भाजपने काल(३० ऑगस्ट) राज्यात आंदोलन केलं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. नितेश राणे यांनी ट्विटरवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरातील व्हिडिओ शेअर करुन सरकारवर निशाणा साधला आहे आहे. “जनतेसाठी मंदिर बंद आणि शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का??”, असा सवाल नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

फक्त जनतेमुळेच कोरोना होतो का?

नितेश राणे ट्विट करत हा विडिओ शेअर केला आहे आणि त्यांनी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. . भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरातील व्हिडीओ शेअर करत आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात कि, “जनतेसाठी मंदिर बंद आणि शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का? फक्त जनतेमुळेच कोरोना होतो का? यांनी कुठले पुण्य केले आहे?” त्याचसोबत आपल्या या ट्विटनंतर नितेश राणे यांनी देखील स्वतः एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात, “भास्कर जाधवांच्या मुलावर कारवाई करा अन्यथा मंदिरं उघडा. अन्यथा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मंदिरं उघडण्याचं काम आम्ही करू”, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

मंदिरं उघडण्याचं काम भाजपाच्यावतीने आम्ही स्वतः करू

नितेश राणे म्हणतात कि, “सत्ताधारी आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा मंदिरात अभिषेक करत असल्याचा व्हिडीओ मी पोस्ट केला आहे. एकीकडे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी मंदिरं बंद ठेवत आहे. करोना होईल अशी कारणं देत आहे. पण दुसरीकडे जर शिवसेनेच्याच आमदाराची मुलं मंदिरात बसून अभिषेक करत असतील तर मग सामान्य जनतेने काय नेमकी चूक केली? हे देखील या ठाकरे सरकारने आम्हाला सांगावं. एकतर भास्कर जाधव यांच्या मुलावर सरकारने कारवाई करावी किंवा सामान्य जनतेसाठी मंदिरं खुली करावीत. अन्यथा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मंदिरं उघडण्याचं काम भाजपाच्यावतीने आम्ही स्वतः करू.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

News Desk

आमचा पक्ष जातीयवादी नाही- जयंत पाटील

swarit

“तर ‘प्रहार’मधून घणाघात करेन!” नारायण राणेंचा सरकारला इशारा

News Desk