HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या काळात राजकारण करणाऱ्या प्रवृतींना त्यांची जागा दाखवायला हवी, अमोल कोल्हे कडाडले 

मुंबई | पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही जोरदार बॅटींग करत भाजपला धारेवर धरले आहे. “कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आली आहे” अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला मतदानाचे आवाहन केले.

“त्या प्रवृत्तींना जागा दाखवून देण्याची संधी” – अमोल कोल्हे

“महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या संकटकाळात जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ राजकारण कोण करतंय, हे पंढरपूर मंगळवेढ्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढ्यातील सूज्ञ मतदारांना मिळाली आहे”.

“भारतनानांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहा” असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट करत व्हिडीओ शेअर करत केले आहेत. भारतनानांवर या मतदारसंघातील जनतेने अलोट प्रेम केलं. भारतनानाही येथील जनतेला आपल्या कुटुंबातील एक घटक मानत असत. भालके कुटुंबीयांशी असणारा हा स्नेह जपत मतदार भगीरथ भालके यांना विजयी करतील, असा विश्वासही कोल्हेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोणाचा झेंडा पंढरपूर निवड़णूकीत झळकरणार हे येत्या काळात पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे आघाडी सरकार आहे की वाधवान सरकार, फडणवीसांचा सरकारला सवाल

News Desk

अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा – यशोमती ठाकूर

News Desk

‘युतीच्या बातम्या तुम्ही रंगवता, मी जो काही आहे तो आहे’, युतीसंदर्भात राज ठाकरेंचं उत्तर!

News Desk