HW News Marathi
महाराष्ट्र

‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे हे कायम महाविकासआघाडीवर निशाणा साधत असतात. . येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल अटी शर्थींसह सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकलबाबात घोषणा करताच भाजप आमदार नितेश राणेंनी जास्त वेळ न दवडता मुख्यमंत्र्यांना डिवचणारं ट्विट करुन मुंबई लोकल सुरु होण्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’, असं म्हणत मुख्यमंत्र्यांना झुकवल्याचं त्यांनी एकप्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकल चालू मात्र अटी लागू

येत्या १५ तारखेपासून लोकल सेवा चालू करण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेले असणं जरुरीचं आहे. तसेच दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेले असणं आवश्यक आहे, असा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनातून जाहीर केला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं सर्वसामान्य मुंबईकरांनी स्वागत केलं, तसं राजकीय पक्षांनीही स्वागत केलं. भाजप आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे भाजपच्या आंदोलनाचं फलित, असं दाखवून देणारं ट्विट केलं आहे.

काय आहे ट्विट?

नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “ये लगा सिक्सर… मुंबई भाजपच्या आंदोलनाला यश…येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु होतीय… ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’, असं ट्विट करुन नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. हे ट्विट करताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा” यांना टॅग करत हे ट्विट केलं आहे.

काय आहेत नवीन अटी?

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.

भाजपचं रेलभरो आंदोलन

कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आता निरबंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र लोकल साठी अजूनही सामान्य जनतेला प्रवास करण्यासाठी मनाई आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकल मधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली मात्र अजूनही निर्णय घेतलेला नाही. याच प्राश्वभूमीवर भाजपने मुंबई रेल भरो आंदोलन सुरु केलं आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आंदोलन

भाजपने आता लोकलच्या निर्णयासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे चर्चगेट स्थानकावर रेलभरो आंदोलन करत आहेत. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करावी या उद्देशाने हे आंदोलन कारणात आलं. पश्चिम सहा मध्य रेल्वे वर हे आंदोलन करण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल, शिरोळ, नृसिंहवाडीत पूरस्थितीची करणार पाहणी

News Desk

ED कडून खडसेंनी तब्बल 9 तास चौकशी ! बाहेर पडल्यावर काय दिली प्रतिक्रिया ?

News Desk

स्वच्छ स्थानकासह प्रवाशांना पुष्पगुच्छ देत भोकर आगाराचा वर्धापन दिन उत्साहात

News Desk