मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचे नाव का घ्यावेसे वाटले, सीबीआयला आम्ही त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती करणार आहोत असे भाजप आमदार नितेश राणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. “आम्ही फक्त युवा नेता म्हणत असून आदित्य ठाकरेंचे नावच घेतले नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्यांचे नाव घेतले नव्हते. भाजपच्या नेत्यांनीही युवा मंत्री असे म्हटले आहे. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असे वाटत असल्याचे आश्चर्य आहे,” असा टोलाही नितेश राणेंनी लगावला. अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
“अनिल परब यांनीच ट्विट करत १३ तारखेला पार्टी झाली असे सांगितलं. अनिल परब यांना काय माहिती आहे याची चौकशी झालीच पाहिजे. संजय राऊत स्वत:च आदित्य ठाकरे यांचं नाव घेत असून आव्हान देत आहेत. आम्ही सोडून सगळे आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यासाटी का आतूर झाले आहेत हे मलाच विचारायचं आहे. शिवसेनेचे नेते जाणुनबुजून सर्व करत आहेत,” असा दावा नितेश राणे यांनी केला.
Sushant Case: BJP नेता Nitesh Rane https://t.co/W0jJJc6Xgc via @YouTube
— nitesh rane (@NiteshNRane) August 20, 2020
तसेच काँग्रेसप्रमाणे शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा वाद सुरु असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. “शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जात आहे. म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जात असून त्यातून विरोधकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं पाहिजे,” अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.“इशाऱ्यावर राजकारण केले जाऊ शकत नाही, नाव सिद्ध करु शकत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे ती योग्य वेळी सीबीआयला हवी असेल, त्यांना गरज असेल, सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोणत्याही टोकाला जाऊन मदत करण्यास आपण तयार आहोत. मागितल्यास माझ्याकडे असणारी माहिती देण्यास तयार आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
“सुशांतने ‘पवित्र रिश्ता’मध्ये केलेली पहिली भूमिका मराठी तरुणाची होती. सुशांत मराठी अस्मिता जपणारा तरुण होती. त्याच्यासाठी आपण उभं राहण्यास तयार आहोत,” असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.“मराठी तरुण, मराठी अस्मिता या गोष्टी नाइटलाइफ करताना आठवत नाहीत का? ओपन जीमचं उद्घाटन करताना नेहमी बॉलिवूड कलाकारच दिसतात. आपले मराठी कलाकार का दिसत नाहीत ? अडचण आली की मराठी अस्मिता, भूमिपूत्र हेच विषय दिसतात. मुंबई पोलिसांची खच्चीकरण केलं जात असून त्यांच्यावर दबाव आहे. कोणाचा दबाव आहे हे सीबीआय तपासात स्पष्ट होईल,” असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.