HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत आणि शाहू महाराज यांची भेटी; मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून केली चर्चा

मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शिवसंपर्क अभियानांतर्गत दोन दिवसाच्या कोल्हापूर दौ-यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यसभेची उमेदवारी काही कारणामुळे देऊ शकले नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांनी शब्द न पाळला, अशा प्रकारची टीका करणे चुकीचे असल्याचे मत श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केली. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार राऊतांनी आज (२९ मे) न्यू पॅलेसमध्ये जावून शाहू महाराजांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी फोनवरून शाहू महाराजांशी संवाद साधल्याची माहिती राऊतांनी दिली.

संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेतून माघार घेतल्याची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती घरण्याचा अपमान केला, असा आरोप संभाजीराजेंनी केला होता. शाहू महाराज म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी टीका करणे चुकीचे आहे. छत्रपती घालण्याचा अपमान यांचा प्रश्न येत नाही. कारण हे राजकारण असून उमेदवारी नाकारली यांचा आमच्या घराण्याचा संबंध आलेला नाही,” असे म्हटले.

शाहू महाराजांची भेट घेतल्यानंतर राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मी शाहू महाराजांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. कोल्हापूरात मी बा-याच वर्षांनी आलो असून मुख्यमंत्र्यांनी मला सकाळी फोन करून सांगितले की, कोल्हापुरात आहात, तर शाहू महाराजांचा आशिर्वाद घ्या आणि मला महाराजांशी बोलायचे आहे. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचे वेगळे नाते आहे. मुख्यमंत्र्यांनी मी स्वतः कोल्हापुरात आल्यात येईन असे सांगितले.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजू शेट्टी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

News Desk

भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार 

News Desk

ना सिद्धू, ना जाखड, अंबिका सोनी यांचाही नकार… आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सुखजिंदर रंधावा!

News Desk