HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“आता वस्त्रहरण अटळ आहे!”, नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

मुंबई | भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत अनिल परब, आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून मला मानहानीची नोटीस येणार का? वकील साहेबांची तर लागली आहे ” अशा आशयाचं ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला होता. निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

नितेश राणे यांचे ट्विट काय?

“मी विचार करत होतो… मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहत आहे. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?” असा उपरोधिक सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.

 

नितेश राणेंनी कालही ट्विटरवरुन निशाणा साधला होता. “ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे!!” असे ट्वीट नितेश राणेंनी केले होते.

अनिल परब यांच्यावर आरोप काय?

निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र देऊन परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. “अनिल परब यांनी आपल्याला जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) कडून ५० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून ५० लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता” असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे.

अनिल परब यांनी आरोप फेटाळले

अनिल परब यांनी सचिन वाझे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवस आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून त्यांना माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता, त्यामुळे तिसरी विकेट काढणार, असं भाजपला आधीच माहिती होतं, असं सांगतानाच मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. हवं तर माझी नार्को टेस्ट करा. मी कधीही वाझेंना अशा प्रकारच्या वसुलीचे आदेश दिले नव्हते, असं परब यांनी स्पष्ट केलं आहे.

Related posts

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

News Desk

बीजेपी से बेटी बचाओ

News Desk

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर हल्ला

News Desk