HW News Marathi
महाराष्ट्र

“ येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका”, नितेश राणेंचा खोचक सल्ला

मुंबई | पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळताना दिसत असल्याचं पाहताच विरोधकांनी सत्ताधारी आमदारांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूरात समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. अद्याप मतमोजणी पूर्ण होऊन अधिकृत घोषणा बाकी आहे. तत्पूर्वी आवताडेंच्या घराबाहेर जल्लोष सुरू झाला आहे. या निवडणुकीत भाजपानं महाविकास आघाडीला मात दिली आहे.

या निवडणुकीच्या निकालावर आमदार नितेश राणेंनी थेट महाविकासच्या आघाडीच्या आमदारांना खुली ऑफर दिली आहे. नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलं की, पंढरपुर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले तरीही लोकानी नाकारले. हा महाविकास आघाडीच्या आमदारांना संदेश आहे. येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका. भाजपा हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे असं ते म्हणाले आहेत.

 

चंदक्रांत पाटलांनीही साधला सरकारवर निशाणा

मंगळवेढा-पंढरपूरमध्ये भाजपाचा स्पष्ट विजय झाला आहे. वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला. पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम झाला.

दुसऱ्याचे शब्द वापरणं मला आवडत नाही. पंढरपूरमध्ये कार्यकर्ते नीट कामाला लागले तर काय होऊ शकतं हे दिसून आलं. तसेच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची घट्ट एकी झाल्याने हा निकाल लागला असल्याचं श्रेय चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्ते आणि परिचारक आवताडे यांच्या एकीला दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हॅलो, उद्धव ठाकरे बोलतोय, मोदीजी २ मे नंतर बोलतील”, सत्यजित तांबेंचं उपरोधिक ट्विट

News Desk

दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर भाजपने स्वत:च्या विरोधात आंदोलन करावे – बाळासाहेब थोरात

News Desk

आषाढी वारीचा कार्यक्रम ठरला,वाखरीपासून दीड किमी पायी वारीला परवानगी

News Desk