HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस पक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर नाही, नितेश राणेंचा आरोप

मुंबई | महाविकासआघाडीतील काँग्रेस पक्षाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर नसल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. काल (१७ नोव्हेंबर) बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन होता. मात्र, संपूर्ण दिवसभरात काँग्रेसच्या एकाही नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी संदेश किंवा साधे ट्विटही करण्यात आले नाही. काँग्रेस बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेणार नसेल तर मग शिवसेनेकडे उरले तरी काय, असा परखड सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि काँग्रेस पक्ष काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन सोहळा काल संपन्न झाला. यानिमित्ताने राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली होती. तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवाजी पार्क येथे शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पंकजा मुंडे, रामदास आठवले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. तर इतर नेत्यांनी सोशल मीडियावरुन बाळासाहेबांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील, राणेंचा प्रहार

News Desk

…तर बाळासाहेब ठाकरे वरून राऊतांच्या एक थोबाडीत मारतील!

News Desk

उद्याची सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक शिक्षण द्या! – अजित पवार

Aprna