HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन मुलाखतीवर नितेश राणेंची टीका!

मुंबई | महाविकासआघाडी सरकारच्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत आज सकाळी प्रसारित होणार आहे. त्यापूर्वी शिवसेनेचे कट्टर विरोधक नितेश राणे यांनी एक ट्विट करुन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना मुलाखत द्यायला हवी होती. ही मुलाखत कंगनाच्या कार्यालयात व्हायला पाहिजे होती आणि त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावर चर्चा झाला पाहिजे होती. तो खरा धमाका ठरला असता. पण सरतेशेवटी मुलाखत कोणाला द्यायची हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे, असे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यामध्ये संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वारातीम विद्यापीठाच्या एमएस्सी केमिकलची प्रवेश परीक्षा 17 जूनला 

News Desk

धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित सतिश चव्हाण यांच्या मागणीला मिळणार यश!

News Desk

“उद्धव ठाकरेंनी धुक्यात भलत्याच व्यक्तीचा हात पकडला”- सुधीर मुनगंटीवार

News Desk