HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेबाबत नितेश राणेंचं अत्यंत मोठं वक्तव्य, विनायक राऊतांनी जाहीर कार्यक्रमात थोपटली पाठ

वेंगुर्ला | भाजप नेते नितेश राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद सगळ्यांना माहित आहेच. मात्र, आज (११ जुलै) चक्क विनायक राऊत यांनी नितेश राणेंची पाठ थोपटली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनी कायमच शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. पण असं असताना आता आमदार नितेश राणे यांनी एक अत्यंत मोठं वक्तव्य केलं आहे.

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेचे आज उद्घाटन करण्यात आले त्यावेळी भाजप आमदार नितेश राणे, रविंद्र चव्हाण तर शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले. याच कार्यक्रमात नितेश राणे यांनी असं वक्तव्य केलं आहे की, ‘पक्षाने आदेश दिल्यास आम्ही शिवसेनेशी देखील जुळवून घेऊ.’ त्यांच्या याच वक्तव्यामुळे उपस्थितीच्या भुवया देखील उंचावल्या होत्या.

दरम्यान, आपलं भाषण संपवून नितेश राणे हे जेव्हा पुन्हा आपल्या जागी आले तेव्हा त्यांच्या बाजूला बसलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चक्क त्यांची पाठ थोपटली. यावेळी नितेश राणे यांनी अगदी हसतहसत त्यांच्या या कृतीला दाद दिली होती.

विनायक राऊत यांनी व्यासपीठावरच थोपटली नितेश राणे यांची पाठ

खरं म्हणजे विनायक राऊत यांच्यावर आतापर्यंत राणे कुटुंबीयांनी अनेकदा गंभीर टीका केली आहे. विनायक राऊत यांनीच नितेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत तब्बल दोनदा पराभव केला आहे. त्यामुळे राणे कुटुंबीयांकडून सातत्याने त्यांच्यावर टीका केली जाते. तर विनायक राऊत सुद्धा त्यांना अनेकदा प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असताना आता नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य आणि विनायक राऊत यांनी दिलेली दाद यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून घेण्यात आला –  फडणवीस

News Desk

त्या’ कक्ष अधिका-याला कारणे दाखवा नोटीस

News Desk

“१२ आमदार तालिबानी किंवा गुंड नाहीत” संजय राऊतांचं वक्तव्य!

News Desk