सिंधुदुर्ग | रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे खासदार विनायक राऊत चांगलेच ट्रोल झाले आहेत. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी या दोन्ही नेत्यांनी मास्क परिधान केला होता. मात्र अचानक खासदार राऊत यांना शिंका आली आणि त्यांनी चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करून आपला हात नाकावर धरून शिंकले. त्यावरून आता भाजप आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊतांवर हल्ला चढवला आहे
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून तोंडावर मास्क घालतात. मात्र शिंकताना खासदार राऊत नेमकं हेच विसरले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते चांगलेच ट्रोल झाले आहेत. आमदार नितेश राणे यांनीदेखील हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदारांना एकदा विचारा त्यांनी मास्क का घातला आहे?, अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे”, अशा शब्दांत आमदार नितेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे.
This is Ratnagiri Sindhdurg MP!
He shud he asked why is he wearing that mask?
God save my Kokan from such fools🙏🏻 pic.twitter.com/4cb77lFVrH— nitesh rane (@NiteshNRane) November 2, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.