HW News Marathi
महाराष्ट्र

‘८० वर्षाचा तरूण योद्धा’ नितेश राणेंच्या शरद पवारांना शुभेच्छा

मुंबई | आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त अगदी पंतप्रधानांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळे शुभेच्छा देत आहेत.वाय बी चव्हाण सेंटर मुंबई येथे या वाढदिवसानिमित्त एका वर्च्युल कार्यकर्माचेही आयोजन करण्यात आले आहे .

राजकारणात नेहमी शरद पवार यांच्यावर टिका करणारे राणे कुटुंबीय आपण पाहिले आहे.भाजपमध्ये असलेले नारायण राणे ,नितेश राणे आणि निलेश राणे हे कधी शरद पवारांना टार्गेट करतात तर कधी अजित पवार,रोहित पवार यांना.पण आज मात्र शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त नितेश राणेंनी शरद पवारांना ८० वर्षांचा तरुण योद्धा म्हणतं शुभेच्छा दिल्या आहेत.शरद पवार यांनी वयाची ८० गाठली असली तरी त्यांचा राजकारणातला उत्साह,काम करण्याची उमेद या सगळ्या गुणाचं राणेंनी एका वाक्यातून कौतुक केलं आहे.शेवटी राजकारणात शरद पवरांचे शत्रू कमी आणि मित्र जास्ती आहेत याचीच प्रचिती आजच्या शुभेच्छांमधून येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही आता उद्धव ठाकरेंकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो !

News Desk

अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री पदावर टांगती तलवार?

News Desk

मुख्यमंत्र्यांनी महाडमधील बचाव कार्याचा आढावा घेतला!

News Desk