कणकवली | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यासभेचे खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. नारायण राणेंचे चिरंजीव नीतेश राणे यांनी आज (३ ऑक्टोबर) कणकवलीतून भाजपकडून अर्ज दाखल करत प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. भाजपच्या सदस्यत्वाचा नोंदणी अर्ज भरला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. नितेश यांनी १ ऑक्टोबरला काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिली होता.
कणकवलीमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीतच कणकवलीच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. नितेश राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.