HW News Marathi
महाराष्ट्र

“दीड वर्ष नाही १५ दिवसांत तुम्हाला धावपट्टी बांधून देतो”, नितीन गडकरींनी दिला शब्द

नवी दिल्ली | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भारतीय हवाई दलाने गुरुवारी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या इमर्जन्सी लँडिंग फील्ड (ईएलएफ)चे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी भारतीय हवाई दलाला वचन दिले की सशस्त्र दलाच्या विमानांसाठी इमर्जन्सी लँडिंग फील्ड दीड वर्षांऐवजी केवळ १५ दिवसांमध्ये तयार केल्या जातील. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बाडमेरमधील राष्ट्रीय महामार्ग ९२५वरील सट्टा-गंधव मार्गावर धावपट्टी बांधण्यास सुमारे १९ महिने लागले होते.

१५ दिवसांच्या आत चांगल्या दर्जाच्या लँडिंग फील्ड तयार

“काल, जेव्हा माननीय वायुसेना प्रमुख माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितले की ही बाडमेरमधील ही लँडिंग फील्ड बांधण्यास दीड वर्षे लागली. मग मी त्यांना सांगितले की, आम्ही तुमच्यासाठी दीड वर्षांच्या ऐवजी १५ दिवसांच्या आत चांगल्या दर्जाच्या लँडिंग फील्ड तयार करू,” असे गडकरी कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना म्हणाले आहेत.

एनएच ९२५ हा भारताचा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे, जो भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी वापरला जातो. गडकरी म्हणाले, “सशस्त्र दलांनी येथे एक लहान विमानतळ तयार केले पाहिजे. माझ्या माहितीनुसार, येथे जवळपास ३५० किमी परिसरात कोणतेही विमानतळ नाही. मी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांना इथे एक लहान विमानतळ तयार करण्यास सांगितलं आहे. त्यासाठी जर तुम्हाला जमीन हवी असेल तर आम्ही ती तुम्हाला देऊ. तुम्ही तिथे आपल्या विभागाअंतर्गत उपक्रम देखील राबवू शकता. तसेच जर खासगी विमान कंपन्यांनी एक किंवा दोन दैनंदिन उड्डाणे सुरू केली तर स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा होईल,” असं गडकरी म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप शासीत राज्यांमधील महिला व दलित अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार!

News Desk

जातधर्मापलीकडे जाऊन कनक्यात साजरी झाली भाऊबीज

News Desk

पतसंस्था मधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत प्रयत्न करु! – अजित पवार

Aprna