HW News Marathi
देश / विदेश

भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा,नाना पटोलेंचा गौप्यस्फोट !

मुंबई | देशभरामध्ये कोरोनाची परिस्थती गंभीर बनत चालली आहे.कोरोना रूग्णांसोबतच मृत्यूचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातून मोदींवर टिका केली जात आहे.मात्र दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींच्या कामाचं मात्र कौतुक होतय.त्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना पंतप्रधान करायची चर्चा भाजपमध्ये चालु आहे असा गौप्यस्फोट केला आहे. ‘देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवं होतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

गडकरी पंतप्रधान असायला हवे !

नाना पटोले यांनी आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी खतांचे वाढलेले दर, चक्रीवादळाने झालेले नुकसान, कोरोना लसीकरण अशा विविध गोष्टींबद्दल भाष्य केले आहे.नाना पटोले म्हणाले,मोदींसमोर गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही”

भाजपमध्ये गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा !

नाना पटोलें यांनी बोलताना भाजपमध्ये गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा असल्याबाबत भाष्य केले आहे. भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. म्हणून आनंद आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेच्या उपसभापती पदी एनडीएचे हरिवंश सिंह विजयी

swarit

माहीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी !

News Desk

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk