HW News Marathi
महाराष्ट्र

“विदर्भातल्या ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो बाकी तुम्ही बघा”, गडकरींचे अजित पवारांना आश्वासन

पुणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील चिंता वाढत चालली आहे. रोज ६० हजारांच्या पुढे नवे रुग्ण वाढत असल्यामुळे याचा आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. ऑक्सिजनचा, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
“मी गडकरींशी बोललो, ते म्हणाले विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही,” असं अजित पवार म्हणाले. पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत आज (२४ एप्रिल) कोरोनासंबंधी आढावा बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिला आहे.
सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रातसुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. याच कारणावरुन राज्यात विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. कोरोनाला थोपवण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, विरोधकांकडू सातत्याने टीका होत असूनसुद्धा ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी कोणताही अभिनिवेश न बाळगता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.
यावेळी विदर्भातील ऑक्सिजन पुरवठ्याकडे आम्ही लक्ष देतो असे, आश्वासन नितीन गडकरी यांनी अजित पवारांना दिले आहे. अजित पवार म्हणाले की, “सध्या रेमडेसिव्हीरच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे. मात्र आगामी दोन-तीन दिवसांत औषध कंपन्या इंजेक्शन प्राधान्याने देतील असं सांगितलं. पण केंद्राने पुन्हा त्यांचा ताबा घेतला आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल मी गडकरींशी बोललो. यावेळी बोलताना विदर्भातील ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असे गडकरी यांनी सांगतिलं. असं जर वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही,” असं अजित पवार म्हणाले.
नितिन गडकरींच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात पहिला ऑक्सिजन टॅंकर आला होता
या आधीही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून भिलई येथील स्टील प्लांटमधून महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला होता. गडकरी यांच्या प्रयत्नातून भिलई येथील स्टील प्लांटमधून महाराष्ट्रात दररोज ऑक्सिजन पुरवठा होण्यास सुरुवात झाली होती. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासह तो साठवून ठेवण्यासाठी सिलेंडर्सचीही आवश्यकता असते. त्यासाठी देखील नितीन गडकरी यांनी व्यवस्था केली आहे. गडकरी यांच्याकडून १००० रिकाम्या सिलेंडर्सची व्यवस्था करण्यात आली होती.
नागपूरातही रेमडेसिविरची टंचाई संपवली होती
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात देखील रेमडीसिविर इंजेक्शनची टंचाई भासत होती. मात्र, हीच टंचाई संपविण्यासाठी आता स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला होता. यामार्फत आता नागपूरमध्ये सन फार्मातर्फे या इंजेक्शनचे १० हजार डोसेस उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे सांगितले. रेमडेसिविर उत्पादक सन फार्मा कंपनीचे मालक दिलीप सांघवी यांच्याशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चर्चा झाली होती. नागपूरमध्ये निर्माण झालेला रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा लक्षात घेता तातडीने ही इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले होते. त्याप्रमाणे, संघवी यांनी पहिल्यांदा तातडीने ५ हजार डोसेस आणि नंतर ५ हजार डोसेस दिले जाणार होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं – अजित पवार

News Desk

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

swarit

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे स्वरुप गंभीर, यावर विचार करावा लागेल – शरद पवार

News Desk