HW News Marathi
देश / विदेश

विकासाला नवी चालना देणारे नितीन गडकरी, स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्री

नागपूर | नितीन जयराम गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ रोजी नागपूरात झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छायेत वाढलेल्या गडकरी यांनी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम केले. यानंतर १९८९ मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. १९८९, १९९६, २००२ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या.

१९९५ साली राज्यात युतीचे सरकारमध्ये आल्यानंतर गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते सोपविण्यात आले होते आणि त्यांनी मुंबईसह राज्यात १०० हून अधिक उड्डाण पुलांची मालिकाच उभारली. विकासपुरुष, ‘रोडकरी’, ‘पुलकरी’, ही बिरुदे त्यांना या काळात चिकटली. इ.स. २००९ साली त्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.

नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ मध्ये गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख निर्माण केली. देशासह विदर्भाच्या विकासाला नवी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. २०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता.

गडकरी यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ईशान्येकडील राज्यांमधील महामार्गांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे गडकरी यांच्या प्रयत्नांतून देशातील जलवाहतुकीलादेखील नवीन संजीवनी मिळाली. वाराणसी ते हल्दिया हा १३९० किलोमीटर लांबीचा जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्यामुळे प्रत्यक्षात उतरला. वाराणसी येथे मल्टीमॉडेल हब स्थापन करुन एक इतिहासच रचला. गंगा नदीच्या स्वच्छतेलादेखील गती आली आहे आणि नदीकाठच्या काही मोठ्या शहरातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे प्रकल्पदेखील कार्यान्वित झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांना २१ व्यांदा ऑस्करमध्ये नामांकन

News Desk

सीबीएसईच्या १० वी, १२ वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

News Desk

न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले, ६ जणांचा मृत्यू तर २० प्रवासी जखमी

News Desk