HW News Marathi
देश / विदेश

न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले, ६ जणांचा मृत्यू तर २० प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश | दिल्लीमालदा न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. हरचंदपूर स्थानकापासून ५० मीटर अंतरावर बुधवारी (१०ऑक्टोबर) सकाळी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेत मृत झालेल्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५०,००० रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.

लखनऊ आणि वाराणसी एनडीआरएफचे जवान घटनास्थळी स्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेनंतर बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवासी झोपेत असताना ही घटना घडली असून नेमके काय झाले हे अद्याप कोणालाच कळाले नाही. ही रेल्वे मालदावरून दिल्लीच्या दिशेने रावाना झाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छुप्या पद्धतीने उत्तर कोरीया बनवतेय जैविक हत्यारं 

News Desk

“फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या ५ वर्षे अगोदरच झालं” पडळकरांची थोरातांवर शेलक्या शब्दांत टीका

News Desk

येत्या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षणसंस्थांमध्ये १० टक्के आरक्षण

News Desk