HW News Marathi
महाराष्ट्र

नितीन गडकरींच्या ताफ्यातील गाडीला अपघात!

नागपूर। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात मात्र कोणाचीही जीवित हानी झालेली नाही. छत्रपती चौकात गडकरींच्या ताफ्यातील गाडी ट्रकवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची पाहणी केल्यानंतर गडकरी निवासस्थानी रवाना झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

नितीन गडकरी सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सात वाहनांच्या ताफ्यासह ते घरी रवाना झाले. छत्रपती चौकातील सिग्नलवर लागल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे गडकरींच्या ताफ्यात सर्वात पुढे असलेले एमएच-01-सीपी-2435 क्रमांकाचे वाहन ट्रकच्या मागील बाजूला धडकले. अपघातात ताफ्यातील कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले. मात्र कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

अपघाताचा जोरदार आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकही वाहनातून बाहेर आले. तसेच पादचाऱ्यांनीही त्या दिशेने धाव घेतली. घटनेची माहिती घेत नितीन गडकरी आपल्या घरी रवाना झाले. या अपघाताची माहिती मिळताच प्रतापनगर आणि धंतोली पोलिसांचा ताफा छत्रपती चौकात दाखल झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत, सचिन सावंतांनी भाजपवर साधला निशाणा!

News Desk

“अरे पोलिसांची कामं अशी करतोस”, अजित पवारांनी ठेकेदाराची काढली खरडपट्टी

News Desk

अखेर MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

Aprna