HW News Marathi
Covid-19

नितीन गडकरींच्या पुढाकारामुळे नागरपूरमधील ‘रेमडीसिविर’च्या तुटवड्याचा प्रश्न सुटला

नागपूर । राज्यातील कोरोनस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. तर केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या लसींच्या तुटवड्यामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक होत आहे. अशातच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा भासत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात देखील रेमडीसिविर इंजेक्शनची टंचाई भासत आहे. मात्र, हीच टंचाई संपविण्यासाठी आता स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. यामार्फत आता नागपूरमध्ये सन फार्मातर्फे या इंजेक्शनचे १० हजार डोसेस उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

रेमडेसिविर उत्पादक सन फार्मा कंपनीचे मालक दिलीप सांघवी यांच्याशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चर्चा झाली आहे. नागपूरमध्ये निर्माण झालेला रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा लक्षात घेता तातडीने ही इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले होते. त्याप्रमाणे, संघवी यांनी पहिल्यांदा तातडीने ५ हजार डोजेस नागपुरात उपलब्ध करुन देणार असल्याचा शब्द दिला असून बाकीचे ५ हजार डोसेस देखील येत्या २ ते ३ दिवसांत उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन दिले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूरकरांना देखील एक आवाहन केले आहे. नितीन गडकरींनी सांगितले की, “नागपूरकरांनी कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी सहकार्य करावे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे, वारंवार हात धुणे या गोष्टींची सवय लावून घ्यावी. गरज नसल्यास बिलकुल घराबाहेर पडू नये. भीती पसरेल असे कोणतेही कृत्य करु नये. त्याचप्रमाणे, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

News Desk

काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही, पण…!

News Desk

महाराष्ट्रात निर्बंध अंशत: शिथिल, दुकाने २ वाजेपर्यंत खुली

News Desk