HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण मग आम्ही भिकारी आहोत का? – नितीन राऊत

अहमदनगर | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत चालला आहेच पण पदोन्नती आरक्षण हा मुद्दाही पेटत चालला आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही. पण आम्ही अजूनही हातात बांगड्या घातलेल्या नाही. आम्ही काय भिकारी आहोत का?” असा सवाल उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या दोन मुद्द्यांवरुन नितीन राऊत यांनी आक्रमक इशारा दिला आहे.

नितीन राऊत मराठवाडा दौऱ्यावर

काँग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पदोन्नतीतील आरक्षणाच्या संबंधित अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, व्ही जे, एनटी यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मते काय आहे हे जाणून घेणार आहेत.

आम्ही जे संविधानात्मक आहे जे भारतीय राज्यघटनेने दिले आहे, तेच आम्ही मागतो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही. मात्र त्यांनीसुद्धा मोठेपणा दाखवून आम्हाला वेठीस धरू नये. आमचं भांडवल करून तेच फक्त काम करु शकतात, आम्ही करु शकत नाही, अशी भूमिका घेऊ नये, अशी टीकाही नितीन राऊत यांनी केली आहे.

नितीन राऊत झाले आक्रमक

आम्ही अजून हातात बांगड्या घातलेल्या नाही. तसेच आम्ही भिकारी नाही, असेही नितीन राऊत म्हणाले. मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती अरक्षणावरून नितीन राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणावरुन घमासान युद्ध

राज्य सरकारने 7 मे रोजी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, हा निर्णय घेताना मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाची जी उपसमिती तयार करण्यात आली त्या समिती विश्वासात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेकांनी रोष व्यक्त केला होता.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती देणारा 7 मे रोजी काढलेला जीआर रद्द होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कायदेशीरबाबींचा अभ्यास करून या प्रश्नावर तोडगा काढणार असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.

Related posts

नमो अ‍ॅप देखील बंद केले पाहिजे, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

News Desk

मुंबईत ३१ मार्चला सगळ्यात जास्त कोरोनाबाधितांची नोंद

rasika shinde

मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची महसूल मंत्र्यांची ग्वाही

News Desk