HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईन, कॉंग्रेसचा इशारा

मुंबई | दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचार्य कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करत आहेत. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही या मोर्चात सहभागी होईल, असं आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती, जमाती सेलच्या कार्यकर्त्यांना केलं. या निमित्ताने महाविकास आघाडीतली काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील धुसफूसही समोर आली आहे.

आपलं सरकार असतानाही अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांवर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा. अपेक्षित न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन करा. कोणताही अन्याय सहन करू नका, असा सल्ला अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. नितीन राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचाच आहेर दिला आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा समावेश करण्यावरून नितीन राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री व पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचं आवाहन केलं आहे. ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर मागवर्गीयांच्या या हक्कासाठी स्वतः देखील या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी नितीन राऊत यांनी दर्शवली आहे.

पदोन्नतीतील आरक्षणाचा वाद पेटणार

दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दलित-मागासवर्गीयांच्या आरक्षणातील पदोन्नतीच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांच्या सारखा मंत्री असूनही पदोन्नतीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे दलित समाजात प्रचंड नाराजीची भावना आहे. या समितीचं अध्यक्षपद दलित मंत्र्याकडे देण्याऐवजी पवारांकडे देण्यात आल्याने दलित समाजात अस्वस्थता असतानाच आरक्षणातील पदोन्नतीवर अद्यापही निर्णय होत नसल्याने आगीत तेल ओतण्याचा प्रकार झाला आहे.

त्यामुळेच राऊत यांनी थेट अजित पवारांच्या घरावरच मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पवार विरुद्ध राऊत असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीत एकत्र असली तरी त्यांच्यात धुसफूस सुरू असल्याचंही दिसून येत आहे. राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत वाढती जवळीक काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेही या दोन्ही पक्षामध्ये वादाची ठिणगी पडत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आपलं सरकार असतानाही अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा – नितीन राऊत

आपलं सरकार असतानाही अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांवर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा. अपेक्षित न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन करा. कोणताही अन्याय सहन करू नका, असा सल्ला अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने काल (२३ मार्च) एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. दुरदृश्य प्रणालीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नितीन राऊत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अन्याय होत असेल तर बेधडक आंदोलन करण्याचा सल्ला दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील नंबर एक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख तर राणेंचा उल्लेखच नाही!

News Desk

कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे होणार उद्घाटन

Aprna