HW News Marathi
महाराष्ट्र

“माणसाने लॅविश राहू नये का?”, भाजपच्या ‘त्या’ आरोपांना उर्जामंत्र्यांचे प्रत्युत्तर  

मुंबई | भाजपने काल (१८ मार्च) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्या सरकारी कार्यालयाचे आणि घराचे फोटो शेअर केलं होतं. यामध्ये ऐषोरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब, शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी, असं म्हणत नितीन राऊत यांच्यावर टीका केली होती. तसेच राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जामंत्र्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही भाजपने केली होती. भाजपच्या या आरोपांना, टीकेला आता उर्जामंत्री नितिन राऊत यांनी उत्तर दिले आहे.

“मला चांगले रहायला आवडते, माणसाने लॅविश राहू नये का?”, असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांना केला आहे. “मी कोणतेही नियमबाह्य काम केलं नसून गेले वर्षभर मी भाड्याच्या घरी राहत होतो”, असंही ते म्हणाले. राज्यात सामान्यांच्या घरची वीज तोडली जात असताना ऊर्जामंत्र्यांच्या आलिशान घरावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे असा आरोप भाजपने केला होता.

ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, “पर्णकुटी बंगला अजून ही वाईट अवस्थेत आहे, त्याचे काम सुरू आहे. गेले एक वर्ष झाले तरी शासकीय निवासस्थान मिळालं नाही. कोरोना काळात शासकीय निवासस्थान मिळालं नसल्यानं भाड्याच्या घरात राहिलो. तेव्हा म्हटलं एक किंवा दोन रूम तरी तयार करुन द्या. आता घर मिळालं असलं तरी त्यामध्ये अजून काम सुरू आहे.”

“माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने असाच रहायचो. मला चांगलं राहायला आवडतं. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही असं सांगत नितीन राऊत म्हणाले की, “सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे. लोकांना जे समजायचं ते समजावं. माझं किचन बघा हे लॅविश आहे का? माणसाने लॅविश राहू नये का? लोकांना वाटतं मी ऊर्जा खात्यात काम करतो, ते लोकांना सलत आहे त्यामुळे त्यांना तिरस्कार वाटतो, त्यांच्या पोटात जळत आहे.”

“फोटोत दिसत असलेला टीव्ही मी माझ्या खर्चाने आणला आहे. माझ्या आधीच्या घरी मोठा टीव्ही होता. तुम्ही इतर मंत्र्यांचे बंगले पाहिले तर ते देखील तसेच आहेत”, असंही नितीन राऊत म्हणाले. “मी वेगळं काही केलं नाही असं सांगत ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, “भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या घरात काय खर्च केला हे त्यांनी पाहावं. हे जर बाहेर आलं तर वाद होईल. मला कोणतेही आरोप करायचे नाहीत, मी जे काही केलं ते नियमानुसार केलं.”

नितीन राऊत म्हणाले की, “मी दलित समाजाचा व्यक्ती आहे. आम्ही टीकाकारांसाठी सॉफ्ट वेपन असतो. सगळेजण आमच्यावर टीका करतात, आम्ही काही काम करू शकत नाही असा आरोप करतात. आरोप करणाऱ्या बातम्या कोण चालवतं हे बघितलं पाहिजे. नुसतं बातम्या चालवल्याने काही होत नाही, बातम्या बघून पक्षश्रेष्ठी काही माझं खात काढणार नाही. ते माझ्याकडे राहणार आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीला, जनता पळ काढायला लावेल; प्रवीण दरकेरांचा सरकारवर निशाणा

News Desk

कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार! – चंद्रकात पाटील

Aprna

प्रसिध्द गझलकार इलाही जमादार यांचे निधन

News Desk