HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

कायदेशीर अडचणींमुळे पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी गुन्ह्याची नोंद नाही ! पुणे पोलीस

पुणे । पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागवला आहे. यावर पुणे पोलिसांनी “पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असे सांगतानाच कायदेशीर अडचणींमुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही”, असे स्पष्टीकरण दिले आहे.

पुणे पोलिस पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ” आम्ही हे प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार आहोत मात्र, काही कायदेशीर अडचणी असल्याने आम्हाला गुन्हा नोंद करण्यात अडचणी येत आहेत. तसेच या प्रकरणातील दोन्ही तरुणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत”, अशी माहिती देखील पुणे पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पूजा चव्हाण हिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केल्याची माहिती देण्यात आली आहे.

परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related posts

घरकुल घोटाळा : गुलाबराव देवकर यांच्या जामीन अर्जावर २६ सप्टेंबरला सुनावणी

News Desk

टास्क फोर्समध्ये कोरोनाचा शिरकाव, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

फडणवीसांच्या दिल्ली मेट्रो प्रवासावरुन कॉंग्रेस, राष्ट्रवादीची टोलेबाजी

News Desk