HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या वाढदिवसाला शुभेच्छांचे होर्डिंग्ज नको !

मुंबई | “माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे लावू होर्डिंग्ज नका. तसेच पर्यावरणाला बाधा पोहोचेल असे काहीही करू नका”, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे. २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असतो. दरम्यान, आपल्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी रस्त्यावर शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावू नये, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. “पैसे व्यर्थ खर्च करण्यापेक्षा सामाजिक उपक्रमासाठी ते पैसे वापरले तर सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यापूर्वी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना अशाच पद्धतीचे आवाहन केले होते. “२२ जुलै रोजी असलेला आपला वाढदिवस भाजपचे लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही बडेजावपणा करून साजरा करू नये”, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. “माझ्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग, बॅनर्स, जाहिराती दिसणार नाहीत, याची भाजपच्या सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खात्री करावी”, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील यापूर्वी अशाच प्रकारचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. “दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, बालमृत्यूचे तांडव सुरु असताना येत्या १५ जुलै रोजी असलेल्या माझ्या वाढदिवशी कसलीही शो-बाजी, पोस्टरबाजी न करता गरजू विद्यार्थ्यांना, परिसरातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मदत करावी”, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिंदेंनी निवडणूक गांभीर्यानं घेणं अपेक्षित होतं!” – शरद पवार

News Desk

केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही!

News Desk

केंद्र सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज तयार करणार ! – नाना पटोले

Aprna