HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभेत अमोल कोल्हे राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांच्या बरोबरीने काम करणार ?

मुंबई | माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना यंदाच्या निवडणुकीदरम्यान मोठी मदत केली होती. परंतु, या दोघांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी याबाबत कोणतेही भाष्य न केले नाही, कोणतेही पाऊल उचलेले नाही. त्यामुळे येथील कार्यकर्ते अमोल कोल्हे यांच्यावर प्रचंड नाराज होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या संतापलेल्या कार्यकर्त्यांना योग्य ती समज दिली आहे.

“दिल्लीत नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे आपले काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. ते केवळ शिरुर किंवा भोसरीपुरते मर्यादित नाहीत. त्यामुळे, स्थानिकांनी, कार्यकर्त्यांनी यावरून गोंधळ घालू नये,” असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना समज दिली आहे. इतकेच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. विधानसभेच्या प्रचारात अमोल कोल्हे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांच्या बरोबरीने काम करतील असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने आग लावण्याचे धंदे बंद करावेत, कॉंग्रेसचा इशारा!

News Desk

“राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत” अजित पवार

News Desk

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये रेल्वेतून उतरवलं!

News Desk