HW News Marathi
महाराष्ट्र

…कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही पालिका जिंकू!

मुंबई | “कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, तरी कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही पालिका जिंकू ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या षडयंत्राचा काहीही फरक पडणार नाही,” असा आत्मविश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. राऊतांनी आज (४ एप्रिल) प्रसार माध्यमांशी बोलताना राज्यातील महानगरपालिका, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट आणि कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत पैसे वापटपाच्या चंद्रकांत पाटलांच्या आरोप आदी मुद्द्यांवर राऊतांनी खरपूस समाचार घेतला आहे. 

राऊत म्हणाले, “मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आम्ही ताकदीने लढवू आणि जिंकू. महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडणारच. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, तरी कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही पालिका जिंकू ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या षडयंत्राचा काहीही फरक पडणार नाही,” असे ते म्हणाले. राऊतांच्या या वक्तव्यावर भाजप काय प्रतिक्रिया देईल. याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

राज ठाकरे-नितीन गडकरी यांच्या भेटीव बोलावे असे काही नाही – राऊत

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवसस्थानी जावून भेट घेतली. यादोघांच्या भेटीनंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले. यासंदर्भात पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारल्यावर म्हणाले, “अशा भेटीगाडी होतच असतात, आम्ही ही अनेक लोकांना भेटतो. आमच्याकडे ही अनेक जण येऊन भेटतात. प्रत्येक भेटीमागे राजकारण असते, असे नाही. आणि त्यांच्या भेटीवर बोलावे असे त्या काही नाही. जत भाजप-मनसे युतीवर काही बोलावे, अशी स्थिती महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात नाही. रात गई, बात गई,” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाव राष्ट्रवादी असून पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणविसांचा शरद पवारांना टोला

News Desk

केंद्राच्या कृषी कायद्याबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार

News Desk

धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेना फोन, तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचा दिला सल्ला

News Desk