HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही !

मुंबई | येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेत धुसफूस सुरु आहेच. त्याचप्रमाणे, सुरुवातीपासूनच शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मात्र, आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या एका विधानानंतर राज्यातही शिवसेनेला धाकट्या भावाचीच भूमिका बजावावी लागणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. “मुख्यमंत्री हा भाजपचा व्हावा अशीच सर्वांची इच्छा आहे. राज्यातील निकाल पाहता मुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही”, असे स्पष्ट विधान गिरीश महाजन यांनी केले आहे.

“लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडणून आल्या आहेत. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठीसुद्धा भाजपने प्रयत्न केले आहेत. आम्हाला सर्वांना असे वाटते कि, मुख्यमंत्रीपद भाजपकडे राहावे. मोठा भाऊ म्हणून सुद्धा आमची हीच भूमिका आहे. तसेच राज्यातील निकाल पाहता मुख्यमंत्री कुणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या निर्धाराचे काय ?

शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी “मंत्री, मुख्यमंत्री पदाचा मुद्दा आमच्यासाठी गौण आहे”, असे म्हटले असले तरीही शिवसेनेचा निर्धार निश्चितच निराळा आहे. ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त छापून आलेल्या सामनाच्या अग्रलेखात “शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल”, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आता दुसरीकडे ‘मुख्यमंत्री भाजपचाच होणार” असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे, पुन्हा शिवसेनेला भाजपसमोर माघार घ्यावी लागणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचा गौप्यस्फोट!

News Desk

‘जॉन्सन अँड जॉन्सन लशीला भारतात मान्यता’, 2 नाही तर घ्यावा लागणार कोरोना लशीचा एकच डोस!

News Desk

तोरंगणा घाटात २५ फूट खोल दरीत खासगी बस कोसळली

News Desk