HW News Marathi
देश / विदेश

‘… तर सीरम इन्स्टिट्यूटमधून एकही ट्रक महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही’

पुणे | महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील लसीकरण मोहीम सध्या थांबली आहे. राज्यातील अनेक लसीकरण केंद्र लस नसल्यामूळे बंद झाली आहेत. मुंबईतही आठवडाभरासाठी फक्त शासकीय लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसी देण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्यात शाब्दिक चकमक सुरू असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना इशारा दिला आहे.

लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला जात असल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर केंद्र-राज्य यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. लस वाटपावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आरोपावर टीका केली होती. हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांनी टीका केल्यानंतर राजेश टोपे यांनी आकडेवारी सांगत राजेश टोपे यांनी सद्यस्थिती सांगितली होती.

‘लस’कारणावरून केंद्र-राज्य यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिलं आहे. “आपण पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिलं आहे. एका आठवड्यात महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही,” असा इशारा राजू शेट्टी यांनी मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांना दिला आहे. त्यामुळे आता तरी केंद्र यात लक्ष घालत पुरेशा लसी पुरवणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा, राफेलचा समावेश हा सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांसाठी एक संदेश!

News Desk

गुगलमुळे हत्येच्या कटातून सुटका

News Desk

अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र राम आजही आपल्या मनात आहेत – पंतप्रधान

News Desk