HW News Marathi
महाराष्ट्र

जे. पी. नड्डा आणि चंद्रकांत पाटील यांना पाठवली नोटीस,  कार्यकारिणीची निवड करताना विश्वासात न घेतल्याचा भाजप कार्यकर्त्याचा आरोप

अहमदनगर | भाजपमध्ये देखील काही नेत्यांची, कार्यकर्त्यांची नाराजी समोर येत आहे. अहमदनर तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरुन नाराज झालेल्या एका भाजप कार्यकर्त्याने थेट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाच नोटीस पाठवली आहे. अहमदनगरमधील कार्यकर्त्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नोटीस पाठवली.

कार्यकारिणीची निवड करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप ठेवत भाजप कार्यकर्ते सुनील पाखरे आणि नवनाथ गर्जे यांच्या वतीने अ‍ॅड. दिनकर पालवे यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. तसेच, जर पाठवलेल्या नोटीसची दखल घेतली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरुन थेट अध्यक्षांना नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारची नोटीस पाठवण्याची ही पहिलीच घटना आहे. महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीच्या स्थापनेनंतर पहिली बैठक सोमवारी (२७ जुलै) पार पडली होती. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नेत्यांना आक्रमक होण्याचा सल्ला दिला. तसेच भाजप पुढील प्रत्येक निवडणुका स्वबळावर लढवेल, असेही त्यांनी म्हटले होते.

महाराष्ट्र भाजप कार्यकारिणी –

प्रमुख कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत १२ प्रदेश उपाध्यक्ष, १२ सेक्रेटरी, ६ जनरल सेक्रेटरी आणि १ कोषाध्यक्ष आहेत. कार्यकारिणीचे सदस्य ६९ असतील, तर निमंत्रित सदस्य १३९ जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२९ अंतर्गत १५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Aprna

संजय राऊतांच्या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघांचं जोरदार प्रत्युत्तर!

News Desk

‘नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात’, केशव उपाध्येंचा राज्यसरकारला टोला

News Desk