HW News Marathi
महाराष्ट्र

नोटीस वॉर…अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस

मुंबई। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्यूत्तर म्हणून नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दरम्यान, मानहानीकारक आणि दिशाभूल करणारे ट्विट ४८ तासांत डिलीट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा. अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोर जा. अशा स्वरूपाची नोटीस अमृत फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी पाठवली आहे.

मानहानीच्या खटल्यासह फौजदारी कारवाईचाही इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे. कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे. एकंदरीत आता अमृता फडणवीसांनी नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली असून नोटीस वॉर, अशा प्रकारचं चित्र रंगताना आपल्याला पहायला मिळत आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रकारचे आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले होते. अंडरवर्ल्डच्या व्यक्तींशी त्यांचे संबंध आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य करत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे राजकीय वातावरण आता ढवळून निघालं असून दोघांनीही ऐकमेकांच्या कुटुंबियांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे याचे नेमके काय पडसाद उमटणार आहेत, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं काय म्हटलंय निलोफर यांनी ट्विटमध्ये ?

निलोफर मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, खोटे आरोप जीवन उद्धस्त करतात आणि एखाद्याने आरोप आणि निंदा करण्यापूर्वी ते कशाबद्दल बोलत आहेत. हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नोटीसमधून खोटे दावे आणि विधान हे माझ्या कुटुंबावर केले आहेत. त्यामुळे आता मी मागे हटणार नाहीये. अशा प्रकारचं ट्विट करत निलोफर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री तुर्तास नाही! – अजित पवार

Aprna

“बेळगाव झांकी आहे, पण मुंबई अभी बाकी है”, चंद्रकांत पाटलांचा सेनेला टोला!

News Desk

एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून पैसे , पुणे पोलिसांची माहिती

Gauri Tilekar