HW News Marathi
Covid-19

सिरमच्या नवीन कोव्होव्हॅक्स कोरोना लसीने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला टाकले मागे

नवी दिल्ली | ऑक्सफोर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड कोरोना लशीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. याचबरोबर कोरोनावरील कोव्होव्हॅक्स लशीचे उत्पादनही सिरम करीत आहे. या लशीने परिणामकारकतेत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला.मागे टाकले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोव्होव्हॅक्स लशीचे 20 कोटी डोस भारताला उपलब्ध होतील, अशी शक्यता केली जात आहे.

कोव्होव्हॅक्स लस नोव्होव्हॅक्स या अमेरिकेतील कंपनीसोबत सिरम तयार करीत आहे. अमरिकेतील या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. याविषयी नोव्होव्हॅक्स कंपनीने म्हटले आहे की, मध्यम ती तीव्र स्वरुपाच्या कोरोना संसर्गापासून ही लस 100 टक्के संरक्षण देते. याचवेळी एकूण 90.4 टक्के संरक्षण ही लस देते. अमेरिका आणि मेक्सिकोतील 119 शहरांमध्ये या चाचण्या करण्यात आल्या. यात 29 हजार 960 जणांचा सहभाग होता. यावर्षातील तिसऱ्या आठवड्यात या लशीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येणार आहे.

या लसीची परिणामकारकता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत 90.4 टक्के आहे. अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्ना यांच्या कोरोना लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतील परिणामकारकता अनुक्रमे 91.3 टक्के आणि 90 टक्के आहे. याचवेळी कोव्हिशिल्डची परिणामकारकता 76 टक्के (अमेरिकेतील चाचण्या) आणि कोव्हॅक्सिनची परिणामकारकता 81 टक्के आहे.

सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा वापर होत आहे. परिणाकारतेचा विचार केल्यास ही लस कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनरपेक्षा अधिक प्रभावी आहे. देशात स्पुटनिक व्ही या लशीचा काही प्रमाणात वापर सुरू आहे. स्पुटनिक व्ही लशीची परिणामकारकता 91.6 असून, जवळपास कोव्होव्हॅक्स लशीएवढीच आहे. कोव्होव्हॅक्स ही लस मध्यम ते तीव्र कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळवून देत आहेत.

कंपनी लशीचे दरमहा 10 कोटी डोस उत्पादित करणार आहे. तिसऱ्या तिमाहीअखेर हा आकडा दरमहा 15 कोटींवर जाईल. जागतिक आरोग्यव्यवस्थेवर आलेल्या कोरोना संकटाच्या काळात ही लस महत्वाची भूमिका बजावणार आहे. जगातील स्थिती पाहता सध्याच्या काळात लशीची अतिशय आवश्यकता आहे, असेही नोव्होव्हॅक्स कंपनीने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काही दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नका, सरकार तुमची काळजी घेईल

News Desk

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार

News Desk

कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करा-अजित पवार

News Desk