HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

आता पुन्हा एकदा प्लास्टिकविरोधाक कारवाई होणार !

मुंबई | “लोकसभा निवडणुकीमुळे प्लास्टीक विरोधातील कारवाई थंडावली होती. आता पुन्हा एकदा प्लास्टीक विरोधात कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती देत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.  राज्यात प्लास्टीक बंदीला नुकतेच एक वर्षपूर्ण झाले आहे. यानंतर ही राज्यात प्लास्टीकचा जर्रास वापर पाहायला मिळतो. प्लास्टीक पिशव्यांचा वापर सुरू झाल्याच्या वापरावरून आज (१ जुलै) विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मुंबई महापालिकेने प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी विशेष अधिकारी नियुक्त केले होते. या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भागात तपासण्यास सुरू करून कारवाई केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी आचारसंहितेमुळे कारवाईचे काम थाबंले होते. आता पुन्हा ही कारवाई सुरुवात केली झाली आहे. ठाणे मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, दादर फुल आणि भाजी मार्केट इथे पुन्हा कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात या कारवाईचे परिणाम दिसून येतील असा दावा कदम यांनी विधानसभेत पवारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. राज्यात ८० टक्के प्लास्टीक गुजरातमधून येत होते, त्यामुळे तिथले लोक बेरोजगार झाले आहेत. गुजरातमध्येही प्लास्टीक बंदी लागू करावी यासाठी मी पंतप्रधानांना पत्र लिहले असल्याची माहितीही कदम यांनी यावेळी दिली.

प्लास्टीक मुद्द्यांवर सभागृहात नेते आक्रमक

सरकारने प्लास्टीक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला काही दिवस कारवाईच्या भीतने प्लास्टीकचा वापर बंद झाला होता. मात्र आता पुन्हा प्लास्टीक पिशव्यांचा वापर सुरू झाल्याचे सांगत, सरकारने प्लास्टीक बंदीविरोधात काय भूमिका घेणार असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विचारला होता. प्लास्टीक बंदीमुळे राज्यातील प्लास्टीक उत्पादन करणारे कारखाने बंद झाले. त्यामुळे बेरोजगार झालेल्यांना सरकार नुकसान भरपाई देणार का ? असा प्रश्न भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा आणि राज पुरोहित यांनी देखील विचारला होता.

 

Related posts

शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध, दहा रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य चाचणी

News Desk

भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये !

News Desk

प्रकाश आंबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटला | भिडे गुरुजींचा आरोप

News Desk