HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर तारीख ठरली, MPSCची परीक्षा २१ मार्चला होणार

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा आता २१ मार्चला होणार आहे. पूर्वनियोजित १४ मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (११ मार्च) वचन दिल्याप्रमाणे, आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे.

MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. सर्वाधिक पुण्यात विद्यार्थी आंदोलनाचा जोर पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री केलेल्या संबोधनात मोठी घोषणा केली. MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख शुक्रवारीच म्हणजेच आज जाहीर होईल आणि परीक्षा येत्या 8 दिवसांच्या आतच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

आठ दिवसात परीक्षा कशी होणार, मुख्यमंत्री काय म्हणाले?

येत्या आठ दिवसांत ही परीक्षा घेणारच, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. परंतु ही घोषणा करताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीपद्दलही मुख्यमंत्री बोलले. मग ही परीक्षा होताना शासकीय यंत्रणेची परीक्षेची तयारी, सुपरव्हिजन करणारे शिक्षक, वर्गखोल्या, त्यात सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आदी विषयांवर मुख्यमंत्री बोलले होते.

आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. विद्यार्थ्यांची सोय करण्यापासून पेपर गोळा करुन गठ्ठे बांधण्यापर्यंत नियोजन करावं लागतं.त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाचं आहे. ज्यांना लस दिली गेली तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नाही तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत’, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंद्राणी मुखर्जीच्या अडचणी वाढल्या

News Desk

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

Aprna

साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी

News Desk