HW News Marathi
Covid-19

जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ५३ लाखांच्याही पुढे

नवी दिल्ली | संपूर्ण जगाला सध्या कोरोनाचा घट्ट विळखा आहे. आतापर्यंत जगातले तब्बल २१३ देश कोरोनाबाधित आहेत. जगातील तब्बल ७५% कोरोनाबाधित हे फक्त १२ देशांमध्येच आहेत. कोरोनाबाधितांच्या आकड्यांचा विचार करता भारत जगात ११ व्या स्थानी आहे. गेल्या २४ तासांमध्ये जगभरातील या देशांमध्ये तब्बल 107,७०६ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जगभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ५३ लाखांच्याही पुढे गेला आहे. तर गेल्या २४ तासांत जगभरात तब्बल ५,२४५ मृत्यू झालेले असून जगातील कोरोनामुळे मृत पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 3 लाख 39 हजार 418 वर पोहोचली आहे. मात्र, या सगळ्यात एक दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत जगभरात तब्बल २१ लाख ५६ हजार २८८ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

आपल्या देशात सध्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १२४,७९४ वर पोहोचला आहे. तर ३,७२६ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनीसार देशात सद्यस्थिती ६९,२४४ कोरोनाबाधित विविध रुग्णलयांमध्ये उपचार घेत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात ५१,८२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.जगात कोरोनाची सर्वाधिक झळ अमेरिकेला बसली आहे. जगातील जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित एकट्या अमेरिकेमध्ये आहेत.अमेरिकेत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १,६४५,०८४ वर पोहोचला आहे. तर अमेरिकेत कोरोनामुळे ९७,६४० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये कोरोनामुळे झालेल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद आहे.

  देश एकूण कोरोनाबाधित मृत्यू
1 अमेरिका 1,645,084 · 97,640

 

2 ब्राझील 330,890 21,048
3 रशिया 326,448 · 3,249

 

4 स्पेन 281,904 · 28,628

 

5 यूके 254,195 36,393
6 इटली 228,658 · 32,616

 

7 फ्रान्स 182,219 28,289
8 जर्मनी 179,713 · 8,352

 

9 टर्की 154,500 4,276
10 इरान 131,652 7,300
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काही दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नका, सरकार तुमची काळजी घेईल

News Desk

दिलासादायक! देशात ४४,१११ नवे रुग्ण आढळले, कोरोनामुक्त होणाऱ्यांचीही वाढली संख्या

News Desk

राज्यात आज ११ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk