HW News Marathi
महाराष्ट्र

रिफायनरीविरोधात नाणारवासीय आक्रमक, आझाद मैदानात धरणे आंदोलन

मुंबई | बहुचर्चित कोकणातील प्रास्तावित असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. मंगळवारी आझाद मैदानातील धरणे आंदोलनात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याची घोषणा रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने केली आहे.

सलग पाचव्या अधिवेशनात हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांसोबत चर्चा करण्यास मुख्यमंत्री तयार नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांचा विरोध समजून घेत जबरदस्तीने प्रकल्प लादणार नसल्याची ग्वाही दिली होती. मात्र तरीही काही एनजीओ मार्फत दलाल व गुंडांची मदत घेत प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार नितेश राणे, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांसह विविध नेते मंगळवारी व्यासपीठावर आले होते.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करण्यासाठीची कागदपत्रे उच्चस्तरीय समितीकडे एप्रिल महिन्यात दिलेली आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या उच्चस्तरीय समितीने आजपर्यंत फाईलवर काहीही कार्यवाही केलेली नाही. याचाच अर्थ जनतेचा आक्रोशाकडे मुख्यमंत्री पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ग्रामस्थांना शाश्वत जीवनशैली आणि उपजीविका हवी आहे. त्यामुळे हा विनाशकारी प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हापरिषद, पंचायत समितीत घवघवीत यश; तर रोहित पवार म्हणतात!

News Desk

कृषी कायद्यावर राष्ट्रपतींचे अजब विधान! कॉंग्रेसची टिका…

News Desk

“शवसेनेने आपल्याच साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले!” अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

News Desk