HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये शिवसेना आक्रमक! किरीट सोमय्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड

बीड | शिवसेनेच्या वतीने बीड शहरामध्ये आज किरीट सोमय्या यांचा प्रतिकृती पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. आयएनएस विक्रांत नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्याने घोटाळा केल्याचा शिवसेनेने आरोप केला आहे. किरीट सोमय्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, म्हणून आज (७ एप्रिल) बीड शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परिसरात बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.

बीड शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमय्यांना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोध करण्यात आलाय. विक्रांत प्रकरणात किरीट सोमयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून जोर धरत आहे. यावेळी महामार्गावर ठिय्या मांडून किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलाय. तर गाढवाच्या गळ्यात देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावून आंदोलन केले गेले. दरम्यान सुरू असलेल्या आंदोलनामुळे तब्बल अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. लातूर आणि औरंगाबाद कडे जाणारी वाहतूक जवळपास अर्धा तास खोळंबली आहे.

यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, जिल्हाप्रमुख कुंडलिक बापू खांडे, बाळासाहेब पिंगळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीता ताई चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख सागर बहीर, जिल्हा समन्वयक जयसिंग मामा चूंगडे, बप्पा साहेब घुगे, फारुक भाई पटेल, अरुण नाना डाके, जिल्हा संघटक नितीन धांडे, उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के, गणेश वरेकर, हनुमान जगताप, भाऊसाहेब लटपटे, रतन तात्या गुजर, तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघण, राहुल चौरे, शहरप्रमुख सुनिल सूरवसे, हुसेन शेख, गणेश बाप्पा उगले, शिवाजी कोलगुडे यांच्या सह शिवसेना, महिला आघाडी, युवासेना सर्व अंगीकृत संघटनेचे आजी- माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता थेट केंद्रीय आरोग्यमंत्रीच म्हणाल्या, ‘उद्धवजी, मंदिरं उघडा!’

News Desk

‘सामनात आमच्याबद्दल कधी चांगलं लिहिलं गेलं?’, फडणवीसांचा सवाल

News Desk

12 वर्षीय मुलगी 27 आठवड्यांची गर्भवती

News Desk