HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळी दिवशी शासनाच्या नावाने शिमगा

संगणक परिचालकांचे आमरण उपोषण सातव्या दिवशीही सुरूच!

दिवाळी दिवशी शासन निर्णयाची केली होळी*

मुंबई

राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या विविध मागण्यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती स्तरावर संगणक परिचालकांचे बेमुदत आमरण उपोषण १२ ऑक्टोबर पासून सुरु आहे सहा दिवस होऊन हि शासनाने निर्णय न घेतल्यामुळे आणि ६ महिन्या पासून मानधन न मिळाल्यामुळे संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात आणि उपोषणात जाणार आहे.या उपोषणाकडे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दुर्लक्ष केले केल्याने संताप व्यक्त होत आहे.त्यामुळे संगणक परिचालकांनी आज दि 18 ओक्टॉबर रोजी ठीक ठिकाणी जाचक अटी असलेल्या शासन निर्णयाची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त केला.

संग्राम प्रकल्पातील संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्रामध्ये नियुक्ती देणे , ज्या “टास्क कन्फर्मेशन”*मुळे मानधन कपात होत आहे तसेच गेल्या ६ महिन्या पासून मानधन न झाल्यामुळे राज्यातील हजारो संगणक परिचालक १२ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणास बसले आहेत ,चार दिवस होऊनही शासनाने टास्क कन्फर्मेशन वर निर्णय न घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात डिजिटल महाराष्ट्र व डिजिटल इंडिया साकार करणारे शिलेदार असलेल्या संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात जाणार आहे .त्यामुळे शासनाने निवडणूक काळात दिलेले अच्छे दिनाचे दिलेले हेच आश्वासन आहे का हेच अच्छे दिन आहेत का अशा संतप्त प्रतिक्रिया संगणक परिचालक व्यक्त करत आहेत .शासनाने आश्वासन न पाळल्यामुळे हे आंदोलन असून टास्क कन्फर्मेशनने संगणक परिचालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

गेल्या २० महिन्या पासून दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे तसेच टास्क क्नफ्र्मेश्न्च्या नावाखाली होणारी मानधनाची कपात यामुळे राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकानी १२ ऑक्टोबर पासून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरु केले असून ६ दिवस होऊन सुद्धा शासनाने दखल न घेतल्यामुळे उपोषणस्थळी शासनाने टास्क कन्फर्मेशन बाबत काढलेल्या जी आर ची होळी करून दिवाळी दिवशी शासनाचा निषेध केला असल्याचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय स्नेहभोजनात राऊत आणि गडकरींची उपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

नववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो;सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो – अजित पवार

News Desk

१५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालय सुरु-  उदय सामंत

News Desk