बीड। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बीड जिल्ह्यच्या अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडी येथील हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याचा मंदिरातच चाकूने हल्ला करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ भागात राहणारे संतोष दासोपंत पाठक (50, राहणार रविवार पेठ, अंबाजोगाई) हे शहरालगत असलेल्या शेपवाडी येथील हनुमान मंदिराच्या पूजाअर्चेचे काम अनेक वर्षापासून नित्यनेमाने करत होते. मराठी नववर्ष गुढीपाडवा या सणानिमित्ताने ते सकाळीच मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी दाखल झाले होते.
काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका माथेफिरूने मंदिरात प्रवेश केला आणि चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. जखमी अवस्थेत पाठक यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तातडीने दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या घटनेने अंबाजोगाई शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.