HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यातील नागरिकांना रमजान ईदच्या शुभेच्छा

मुंबई | मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्रनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. “दयाभाव आणि दातृत्व यांचे महत्त्व सांगणारा हा सण आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारे हे पर्व सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

“ईद-उल-फित्र तथा रमजान ईद सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, समता, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. रमजान ईदच्या निमित्ताने वंचित बांधवांना मदत करुन त्यांच्या जीवनात आनंद आणूया. यंदाची ईद एकोप्याने, आनंदाने, उत्साहाने साजरी करुया. मानवकल्याण, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देऊया…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रमजान ईदनिमित्ताने दिलेल्या शुभेच्छा संदेशात अजित पवार म्हणतात की, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होतो. मुस्लिम बांधवांच्या बरोबरीने सर्वधर्मीय बांधव ईदच्या आनंदात सहभागी होतात. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात साजरी होणारी रमजान ईद समाजात आनंद, उत्साहाचे वातावरण घेऊन येईल. देशवासियांमध्ये एकजुटीची, सहकार्याची, बंधुत्वाची भावना वाढीस लावेल. ही भावनाच महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कडक शिस्तीचे प्रशासक’ उपमा देत जयंत पाटलांनी नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा

News Desk

ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, तिथे घाईघाईने कारवाया करणं हा तपास यंत्रणांना छंद!

News Desk

होय कर्जमाफीची घाई केली…त्यामुळेच चूका !

News Desk