HW News Marathi
महाराष्ट्र

गुढी पाडव्याच्या निमित्ताने मराठी हिंदू दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई | गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa) निमित्ताने मराठी हिंदू दिनदर्शिकेचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम मराठी हिंदु नववर्ष गुढी पाडव्यानिमित्त सर्वांना भारतीय जनता पक्ष आणि लोढा परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. करोनाचा संकट टळल्यानंतर प्रथमच हिंदु सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत.

आपल्या सणांचं, उत्सवांचं, हिंदुधर्मातील प्रथा परंपरांचं ज्ञान येणाऱ्या पिढीला कळावे. यासाठी गुढी पाडव्याच्या निमित्ताने मराठी हिंदू दिनदर्शिकेचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे जी,  आशिष शेलार, पराग अलवानी, खासदार पुनम महाजन आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विलेपार्ले विधानसभेत लोकमान्य सेवा संघातर्फे शताब्दी वर्षाअंतर्गत आयोजित हिंदू नववर्ष स्वागत स्फूर्तीयात्रेत या दिनदर्शिकेचे उद्धाटन करण्यात आले. या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांची क्षणचित्रे आणि प्रत्येक मराठी हिंदु महिन्यातील सणांची माहिती यात विषद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जन्मदिनी भाजपाकडून अपशकुन,हसन मुश्रीफांचा आरोप !

News Desk

मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी

News Desk

महाराष्ट्र भाजप महामंडळाने त्यांचा निधी राज्यात नव्हे तर केंद्रात वळवला, सामनातून टीका

News Desk