HW News Marathi
महाराष्ट्र

गुढीपाडवा निमित्ताने धनंजय मुंडेनी घेतले प्रभु वैद्यनाथाची दर्शन

बीड | गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाचे औचित्य साधून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सपत्नीक प्रभु वैद्यनाथाची महापूजा व दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे. आणि आगामी वर्ष राज्यातील जनतेसाठी आरोग्यदायी ठरावे असे साकडे घातले. तसेच कोरोना महामारीच्या संकटानंतर पहिल्यांदाच आजपासून (२ एप्रिल) प्रभु वैद्यनाथाचे स्पर्श दर्शन भाविकांना खुले करण्यात आले आहे. यामुळे आज साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाड्यानिमित्त दर्शन घेण्यासाठी मोठया संख्येने भाविक भक्तांनी गर्दी केली होती.

राज्य सरकारने तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना काळातील सर्व निर्बंध उठवल्यानंतर गुढीपाडवा मोठ्या धामधुमीत साजरा होत आहे. राज्यभरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा सुरू आहेत. गिरगावच्या शोभायात्रा हे मुंबईकरांचे लक्ष असते. गिरगांव येथील गुढीपाडव्याच्या शोभा यात्रेला उत्साहाने सुरुवात झाली आहेत. निर्बंध मुक्त नववर्षाची सकारात्मकतेने सुरुवात झाली आहे. गिरगांव येथील गुढीपाडव्याच्या शोभा यात्रेला उत्साहाने सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात नागरिक नववर्षाचे हर्षोल्लाहासने स्वागत करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे, व्यापाऱ्यांची शरद पवारांकडे निवेदनाद्वारे मागणी

News Desk

काँग्रेसला आधी जनतेने झिडकारलं, त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारनेही झिडकारलं, भाजपची बोचरी टीका

News Desk

खडसेंनी माझा प्रचंड छळ केला, याला देवेंद्र फडणवीसही जबाबदार !

News Desk